पुणे – ‘मला मुंबईला घेऊन जा… माझ्या मुलीचे जसे तुकडे केले तसे त्याचे करू द्या, माझ्या मुलीला मीच न्याय देऊ शकते, अशा शब्दांत दर्शन पवारच्या आईने माध्यमांशी बोलतांना संताप व्यक्त केला आहे. तर दर्शनाच्या भावाने माध्यमांशी बोलतांना आरोपीला आमच्या ताब्यात द्या नाहीतर त्याला मारून टाका अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवारच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी पाच पथके तयार केली गेली आता या आज प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहिती नुसार, दर्शना हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मुंबई येथून राहुल हंडोरेला अटक करण्यात आली आहे. दर्शनाच्या हत्येचं कारण आता समोर आले आहे.
वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहिती नुसार, दर्शना आणि राहूल गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र परीक्षेपूर्वी राहुलनेच ब्रेकअप केलं होतं. मात्र दर्शना अधिकारी झाल्यावर राहुल पुन्हा लग्नासाठी मागे लागला होता. त्यांनी वर्षभरापूर्वी एम पी एस सी परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली होती. मात्र या प्रयत्नांमध्ये दर्शनाला आधी यश आले आणि तिने वन विभागाची परिक्षा उत्तीर्ण केली. वन अधिकारी बनण्याची फक्त औपचारिकताच उरली होती.
दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्या मुलासोबत जमवले आणि लग्नाच्या हालचाली सुरु केल्या. त्यामुळे राहूल हंडोरे अस्वस्थ होता. त्याने त्याला एम पी एस सी ची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा आणि तो देखील परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल असे दर्शना आणि तिच्या कुटुंबीयांना सांगून पाहिले. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने राहूलने राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाची हत्या केली.