मुंबई – अभिनेता प्रभास ‘आदिपुरुष’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या या चित्रपटावर देशभरातून टीका केली जात आहे. काही ठिकाणी या चित्रपटावर बंदी घालण्याची देखील मागणी केली जात आहे. एकीकडे ही चर्चा सुरू असतानाच प्रभासची एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चा रंगली आहे. ‘बाहुबली’ या सुपरहिट चित्रपटानंतर त्याने त्याच्या मानधनात तगडी वाढ झाली आहे. त्याने इटलीत एक व्हिला विकत घेतला असून तो भाड्यानेही दिला आहे. यातून तो दरमहा लाखो रुपयांची कमाई करतो.
प्रभासने गुंतवणुक म्हणून एक आलिशान व्हिला विकत घेतला आहे. प्रभासला जेव्हा शूटिंगमधून ब्रेक मिळतो तेव्हा तो तिथे जाऊन मित्रांसोबत वेळ घालवतो. जेव्हा तो आपल्या कामात व्यस्त असतो, तेव्हा तो त्याचा व्हिला पर्यटकांना आणि स्थानिकांना भाड्याने देतो. त्यामधून त्याला दरमहा 40 लाख रुपये भाडे मिळते.
प्रभासच्या आदिपुरुष या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. या चित्रपटाला पहिल्यादिवशी मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र त्यानंतर या चित्रपटाच्या कमाईत घट झाल्याचे पाहायला मिळाले. या चित्रपटावर टीका होत असताना सध्या प्रभास अमेरिकेमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. आदिपुरुषनंतर प्रभास लवकरच नव्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचा ‘सालार’ हा चित्रपट या वर्षी 28 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.