पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्या 127 व्या वर्षानिमित्त आयोजित उत्सवाचा प्रारंभ हजारो भक्तांच्या साक्षीने झाला. “गणपती बाप्पा मोरया’… “जय गणेश’च्या जयघोषात शेषात्मज रथातून निघालेल्या दिमाखदार आगमन मिरवणुकीने वाजत गाजत श्री गणेश सूर्यमंदिरात दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान झाले.
श्री गणेश सूर्यमंदिरात सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी शिर्डी कोकमठाण येथील प.पू.विश्वात्मक ओम गुरुदेव जंगलीदास महाराज यांच्या हस्ते विधीवत श्रींची प्रतिष्ठापना झाली. तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रोषणाईचे उद्घाटन करण्यात आले.