उत्तर प्रदेश : कानपुर येथील ग्रामीण रुग्णालयात एक विचित्रच घटना घडली. या रुग्णालयातील महिला वार्डमध्ये बुरखा घातलेला एक तरुण थेट घुसला यानंतर काही तासात जेव्हा वार्डमधील महिलांना त्याच्यावर संशय आला. त्यावेळी एकच खळबळ उडाली. त्यानंतर रुग्णालयातील नर्स आणि महिलांनी त्याला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली.
यानंतर पोलिसांनी घटनेचं संपूर्ण तपास केले असता अशी माहिती समोर आली की, बुरखा घालून महिला वार्डमध्ये पकडलेली व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून महिला डॉक्टरचा ड्रायव्हर होता.
पोलिसांनी या ड्रायव्हर चा संपूर्ण तपास केला असता, ड्रायव्हर रईसनं केवळ महिलांचे कपडे आणि बुरखा परिधान केला नव्हता, तर त्यानं महिलांचे अंडरगारमेंट्सही घातले होते. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर रईस म्हणाला की, मला लेडीज बाथरूम बघायचं होतं. म्हणून मी बुरखा घातला.
तपासावेळी तो म्हणाला की,’महिलाडॉक्टर गजालाचा कार ड्रायव्हर आहे. तर याबाबत रईसच्या कुटुंबीय म्हणतात की तो पूर्णपणे मानसिकदृष्ट्या ठीक नाही, त्यामुळे असं होऊ शकते.’