नवी दिल्ली : आज सकाळपासूनच मुंबई सह देशात सर्वत्र पाऊस पडताना दिसत आहे. त्यातच दिल्लीतून एक व्हिडीओ समोर आला आहे. दिल्लीमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस पडला असून त्यामुळे राजधानीतील रस्तेच नव्हे तर देशातल्या सर्वोत्तम विमानतळांपैकी एक असणारे इंदिरा गांधी इंटरनॅशनल एयरपोर्ट पाण्यात गेल्याचे समोर आले आहे.
#WATCH | Parts of Delhi Airport waterlogged following heavy rainfall in the national capital; visuals from Indira Gandhi International Airport (Terminal 3) pic.twitter.com/DIfUn8tMei
— ANI (@ANI) September 11, 2021
दिल्ली विमानतळाची धावपट्टीच नव्हे तर विमानतळाच्या आतमध्येही पाणी शिरले आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दिल्ली विमानतळाचे व्यवस्थापन हे जीएमआर या खासगी संस्थेकडे आहे. या विमानतळावर गेल्यानंतर आपल्याला दिल्ली विमानतळ हे देशातील सर्वोत्तम विमानतळ असल्याचे बोर्ड पहायला मिळतात. आता याच विमानतळावर सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे उत्तम व्यवस्थापनेचा दावा करणाऱ्या जीएमआर कंपनीचा दावा किती फोल ठरला आहे हे दिसून येत आहे.
#WATCH : Waterlogged @DelhiAirport 🌧 pic.twitter.com/ioBvKoTz9Y
— Ashoke Raj (@Ashoke_Raj) September 11, 2021
अचानक आलेल्या पावसामुळे विमानतळावर पाणी साचले असून प्रवाशांना झालेल्या तसदीबद्दल खेद व्यक्त करत आहोत असे दिल्ली विमानतळाच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले. थोड्याच वेळात पाणी बाहेर काढण्यात येईल असेही आश्वासन व्यवस्थापनाने दिले आहे.
दिल्लीत गेल्या 45 वर्षातील रेकॉर्डब्रेक पाऊस पडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दिल्लीचे जनजीवन विस्कळीत झाले असून शहरातल्या रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचे दिसून येत आहे.