#CWC2023 IND vs AUS Live Score : कर्णधार रोहित शर्माच्या भारतीय संघाची एकदिवसीय विश्वचषक मोहीमेस आजपासून सुरूवात झाली आहे. भारतापुढे पाच वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. दोन्ही संघांना त्यांच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने करायची आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान,रविंद्र जाडेजाच्या फिरकीच्या जाळ्यात ऑस्ट्रेलिया संघ अडकला. ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ 119 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.रविंद्र जाडेजाने 6 षटकात 18 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या आहेत. रविंद्र जाडेजाने जम बसलेल्या स्मिथ आणि लाबुशेन यांना बाद केल्यानंतर अॅलेक्स कॅरीलाही तंबूचा रस्ता दाखवला आहे. त्याला तर भोपळाही फोडता आलेला नाही.
And now the wicket of Alex Carey who is out L.B.W ☝️
Ravindra Jadeja gets his third wicket 💪#CWC23 | #INDvAUS | #TeamIndia | #MeninBlue https://t.co/sENFdrH6Jm
— BCCI (@BCCI) October 8, 2023
रविंद्र जाडेजाने अॅलेक्स कॅरीला बाद करत ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का दिला. कॅरी याला खातेही उघडता आले नाही. जडेजाने त्याला पायचित(LBW)केलं. त्याआधी जाडेजाने लाबुशेन याला बाद करत ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का दिला.लॅबुशेनने 41 चेंडूत 27 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून फक्त एक चौकार आला. लोकेश राहुलने त्याला विकेटच्या मागे झेलबाद केले.110 धावांवर ऑस्ट्रेलियाची तिसरी विकेट पडली. रवींद्र जडेजाने स्टीव्ह स्मिथला क्लीन बोल्ड केले. स्मिथने 71 चेंडूत 46 धावा केल्या. त्याचे अर्धशतक हुकले.
दरम्यान, ड्रिंक्स ब्रेकनंतर डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने भारताला दुसरे यश मिळवून दिले. त्याने 17व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला बाद केले. वॉर्नरने 52 चेंडूत 41 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार मारले. बाद होण्यापूर्वी वॉर्नरने स्टीव्ह स्मिथसोबत दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. याआधी पाच धावांच्या स्कोअरवर ऑस्ट्रेलियन संघाची पहिली विकेट पडली. जसप्रीत बुमराहने मिचेल मार्शला विराट कोहलीकरवी झेलबाद केले. मार्शने सहा चेंडूंचा सामना केला, पण त्याला खातेही उघडता आले नाही.