Photo Gallery : रवींद्र जडेजाच्या नावावर खास विक्रमाची नोंद; विराटसह अनेक दिग्गजांना टाकलं मागे…

Updated On:-8 फोटो
Photo 1
1 / 8

आणखी संबंधित फोटो

IND vs ENG 3rd Test : राजकोट येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा 434 धावांनी पराभव केला आहे. राजकोट कसोटीनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची कसोटी मालिका रोमांचक वळणावर आली आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला आणि पुढचे दोन सामने टीम इंडियाने जिंकले. या मालिकेत भारतीय संघ आता 2-1 ने आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत मालिकेतील चौथा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.

पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडचा 434 धावांनी पराभव केला.

या सामन्याच्या पहिल्या डावात 112 धावा करणाऱ्या रवींद्र जडेजाने गोलंदाजीतही कमाल केली.

रवींद्र जडेजाने गोलंदाजीत पहिल्या डावात 2 आणि दुसऱ्या डावात 5 बळी घेतले.

उत्कृष्ट कामगिरीसाठी रवींद्र जडेजाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

जडेजाने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हा 10वा सामनावीराचा पुरस्कार पटकावला.

जडेजाने 70 कसोटी सामन्यांमध्येच 10 सामनावीर पुरस्कार पटकावले आहेत.

जडेजा सर्वात कमी कसोटी सामन्यांमध्ये 10 सामनावीर पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला.

विराट कोहलीने 10 वा सामनावीराचा पुरस्कार हा त्याच्या 108व्या कसोटी सामन्यात पटकावला होता.

याच कामगिरीसाठी सचिन तेंडुलकरला 111, अनिल कुंबळेला 119 आणि राहुल द्रविडला 146 कसोटी सामने खेळावे लागले होते.

आणखी संबंधित बातम्या

Virat Kohli Statement : "५ कोटी घेऊन वृंदावनला गेलो नाही!"; प्रेमानंद महाराजांच्या भेटीवरील आरोपांवर विराट कोहलीचे अधिकृत स्पष्टीकरण

Virat Kohli Statement : "५ कोटी घेऊन वृंदावनला गेलो नाही!"; प्रेमानंद महाराजांच्या भेटीवरील आरोपांवर विराट कोहलीचे अधिकृत स्पष्टीकरण

Virat Vrindavan Controversy : "महाराजांचा टीआरपी वाढवण्यासाठी विराटचा वापर!"; ५ कोटींच्या डीलचा दावा करत वृंदावनमध्ये मोठा वाद; पाहा VIDEO

Virat Vrindavan Controversy : "महाराजांचा टीआरपी वाढवण्यासाठी विराटचा वापर!"; ५ कोटींच्या डीलचा दावा करत वृंदावनमध्ये मोठा वाद; पाहा VIDEO

Top 10 Sports News : ॲथलेटिक्समध्ये 56 वर्षांनंतर रौप्य, विराटचा महाविक्रम अन् आशियाडमध्ये भारत-पाक महामुकाबला; पाहा क्रीडाविश्व गाजवणाऱ्या टॉप-१० घडामोडी!

Top 10 Sports News : ॲथलेटिक्समध्ये 56 वर्षांनंतर रौप्य, विराटचा महाविक्रम अन् आशियाडमध्ये भारत-पाक महामुकाबला; पाहा क्रीडाविश्व गाजवणाऱ्या टॉप-१० घडामोडी!

Virat Kohli Record : 'किंग' कोहलीचा विराट पराक्रम! सचिन तेंडुलकरचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास

Virat Kohli Record : 'किंग' कोहलीचा विराट पराक्रम! सचिन तेंडुलकरचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास