नवी दिल्ली – कर्नाटकात (Karnataka) फटाक्याच्या दुकानाला (Firecracker shop fire ) लागलेल्या भीषण आगीत 14 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी रविवारी अणेकल शहरातील अटीबेले येथील फटाक्यांच्या दुकानाच्या मालकाला ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशी होईपर्यंत दुकानाचा मालक आणि त्याच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
आगीचे कारण शोधण्यासाठी आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी सखोल चौकशी सुरू आहे,” असे डीजीपी मोहन यांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी दुपारी 3.30 च्या सुमारास दुकानातील कामगार एका वाहनातून फटाके उतरवत असताना ही आग लागली.दरम्यान, कर्नाटक सरकारने या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.(Firecracker shop fire)
उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी शनिवारी रात्री आगीच्या ठिकाणी भेट दिली आणि अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली.दिवाळी फार दूर नसल्यामुळे, पोलिसांना राज्यभरातील फटाक्यांची दुकाने आणि गोदामांमध्ये अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे शिवकुमार यांनी सांगितले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.