Ravindra Jadeja became the player of the match : इंग्लंडविरुद्धच्या राजकोट कसोटी सामन्यात भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही उत्कृष्ट होती. भारताच्या वतीने या सामन्यात यशस्वी जैस्वालने दुसऱ्या डावात नाबाद द्विशतक झळकावले, तर कर्णधार रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजाने पहिल्या डावात शतके झळकावली. याशिवाय पहिल्या डावात भारताकडून मोहमद सिराजने सर्वाधिक विकेट्स घेतल्या, तर जडेजाने दुसऱ्या डावात इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्यात यश मिळवले. या कसोटी सामन्यात उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी रवींद्र जडेजाला सामनावीराचा किताब देण्यात आला.
A superb hundred with the bat in the 1st innings and a five-wicket haul in the 2nd innings 🙌
The local lad @imjadeja receives the Player of the Match award 🏆 in Rajkot 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/FM0hVG5X8M#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Fa99xqv8WG
— BCCI (@BCCI) February 18, 2024
जडेजाची राजकोटमधील कामगिरी..
भारताच्या अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा तिसऱ्या कसोटी सामन्याचा सामनावीर ठरला. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली. पहिल्या डावात 225 चेंडू खेळताना (9 चौकार आणि 1 षटकार) 112 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तसेच गोलंदाजीतही 10 षटकात 51 धावा देताना 2 गडी बाद केले. त्यानं कर्णधार बेन स्टोक्सला आणि टॉम हार्टले यांना बाद केलं.
दुसऱ्या डावात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही पण त्यानं गोलंदाजीत चमक दाखवताना इंग्लंडची बेझबाॅल रणनिती फोल ठरवली. त्यानं दुसऱ्या डावात 12.4 षटकात 41 धावा देताना सर्वाधिक 5 गडी बाद केले. त्यानं आॅली पोप, जो रूट, जाॅनी बेअरस्टो, बेन फोक्स आणि मार्क वूड या फलंदाजांना बाद केले. अशाप्रकारे त्यांन सामन्यात एकूण 112 धावा आणि 7 विकेट घेताना महत्वूर्ण योगदान दिले.
यशस्वीची कामगिरी…
तिसऱ्या सामन्यात यशस्वी जैस्वाल पहिल्या डावात अपयशी ठरला होता. तो केवळ 10 धावा काढून माघारी परतला होता. मात्र दुसऱ्या डावात त्याने अप्रतिम कामगिरी करत द्विशतक झळकावले. यशस्वीने 236 चेंडूत 214 धावांची नाबाद खेळी खेळली. यशस्वीने आपल्या खेळीत 14 चौकार आणि 12 षटकार मारले.
दरम्यान, या सामन्यात भारताने इंग्लंडचा 434 धावांनी पराभव केला आणि आता 23 फेब्रुवारीपासून रांचीमध्ये चौथा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.