रांची :- पत्नीचा वाढदिवस आपल्या कुटुंबीयांसह साजरा करत असताना त्याच दिवशी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला . यावेळी पत्नीच्या वाढदिवसाचा आनंद साजरा करत असतानाच धोनीने संघाच्या पराभवाबद्दलही निराशा व्यक्त केली.
या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने प्रत्येक सामन्यात आपले वर्चस्व सिद्ध केले मात्र, तरीही ते विश्वविजेतेपदापासून दूर राहील्यामुळे खूप वाइट वाटले, असे धोनी म्हणाला. प्रमुख फलंदाज बाद झाल्यावर भारतीय संघावर प्रचंड दडपण आले व त्यामुळेच हा पराभव झाला असेही तो म्हणाला.
ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी विजय…
दरम्यान, या संपूर्ण विश्वचषकात टीम इंडिया अजिंक्य होती. इंडियानं सर्व 10 सामने एकतर्फी पद्धतीने जिंकून अंतिम फेरी गाठली होती. येथे टीम इंडियाचा विजयाचा दावा मजबूत होता पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. विश्वचषक फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 240 धावा केल्या, जे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी 7 षटक शिल्लक असताना पूर्ण केले. कांगारू संघाने येथे 6 गडी राखून विजय मिळवला.
या स्पर्धेत एकही सामना न हरलेल्या भारतीय संघाला दुर्देवाने अंतिम सामन्यात पराभवाचं तोंड पहावं लागलं अन् 12 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकण्याचं भारताचं स्वप्न धुळीस मिळालं. यानंतर आपल्याला एवढी मेहनत केल्यानंतरही वर्ल्ड कप जिंकता आला नाही याचं दु:ख भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं.