ICC ODI World Cup 2023 England vs Netherlands Match live Score : विश्वचषक 2023 च्या 40व्या सामन्यात आज इंग्लंडचा सामना नेदरलँडशी होत आहे. हा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे खेळवला जात आहे. दोन्ही संघ अधिकृतपणे उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. दहा संघांच्या टेबलमध्ये इंग्लंड सात सामन्यांत फक्त एक विजय मिळवून शेवटच्या स्थानावर आहे, तर नेदरलँड्सची स्थिती थोडी चांगली आहे. हा संघ तब्बल दोन विजय आणि चार गुणांसह नवव्या स्थानावर आहे.
इंग्लंडने नेदरलँड्ससमोर विजयासाठी 340 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत इंग्लंड संघाने 50 षटकांत नऊ गडी गमावून 339 धावा केल्या. इंग्लंडकडून फलंदाजीत अनुभवी फलंदाज बेन स्टोक्सने 108 धावा केल्या. त्याने 84 चेंडूंच्या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकार मारले. स्टोक्सचे हे विश्वचषक इतिहासातील पहिले शतक आहे.
We finish our overs in Pune on 3️⃣3️⃣9️⃣
Chris Woakes 51 (45)
Dawid Malan 87 (74)
Ben Stokes 108 (84)Well batted, lads 💪#EnglandCricket | #CWC23 pic.twitter.com/OAUBYQTemp
— England Cricket (@englandcricket) November 8, 2023
डेव्हिड मलानने 87 आणि ख्रिस वोक्सने 51 धावा केल्या. जो रूटने 28, जॉनी बेअरस्टोने 15 आणि हॅरी ब्रूकने 11 धावा केल्या. डेव्हिड विली केवळ सहा, जोस बटलर पाच आणि मोईन अली केवळ चार धावा करू शकला.
नेदरलँड्स संघाकडून गोलंदाजीत बास डी लीडेने 10 षटकात 74 धावा देताना तीन बळी घेतले. याशिवाय आर्यन दत्त आणि व्हॅन बेक यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या तर व्हॅन मिकरेनला 1 विकेट्स घेतली.