मेलबर्न – ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ आणि पाकिस्तान सध्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत आमनेसामने आहेत. मालिकेतील पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाच्या नावावर होती. मेलबर्न क्रिकेट मैदानावर दुसरी कसोटी खेळली जात आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा या मालिकेत आतापर्यंत बराच वादात सापडला आहे. उस्मान पहिल्या कसोटीत आयसीसीची परवानगी न घेता पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ काळ्या हाताची पट्टी बांधून हजर झाला होता. आता दुसऱ्या टेस्टमध्येही ख्वाजा त्याच्या बुटांमुळे चर्चेत आला आहे.
ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजा 14 डिसेंबरपासून पाकिस्तानविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत हमास-इस्रायल युद्धाला विरोध केल्यामुळे चर्चेत आहे. उस्मान मंगळवारपासून मेलबर्नमध्ये खेळल्या जात असलेल्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये (दुसरा सामना) त्याच्या बुटांवर त्याच्या मुलींची नावे लिहून मैदानावर उतरला. त्याच्या शूजचा (बूट) फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
Usman Khawaja has the names of his children on his shoes today #AUSvPAK pic.twitter.com/g7Aadc2g18
— cricket.com.au (@cricketcomau) December 26, 2023
त्याआधी १४ ते १८ डिसेंबर दरम्यान पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात संदेश असलेल्या शूजला मान्यता न मिळाल्याने तो हातावर काळी पट्टी बांधून त्यावर संदेश लिहून खेळला होता. त्यानंतर आता बॉक्सिंग डे मॅचच्या पहिल्या दिवशी उस्मानने त्याच्या शूजवर आयशा आणि आयला या आपल्या मुलींची नावे लिहून मॅच ओपनिंग केली.
“Uzzy’s always been a leader around the group” – David Warner throws his support behind his good mate and opening partner #AUSvPAK pic.twitter.com/2ehSLAZZE2
— cricket.com.au (@cricketcomau) December 26, 2023
पहिल्या टेस्टनंतर उस्मान म्हणाला होता की, पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षात मारल्या गेलेल्या मुलांचे सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिल्यावर मी भावूक होतो. माझ्या दोन्ही मुली माझ्या मांडीवर आहेत याची मला जाणीव झाली. काळी पट्टी बांधून मैदानात येणे म्हणजे शोक व्यक्त करणे, असे ते म्हणाले होते. माझा कोणताही छुपा अजेंडा नाही.
बॉक्सिंग डे कसोटीदरम्यान बॅट आणि शूजवर ऑलिव्ह झाडाची फांदी असलेल्या काळ्या कबुतराचे स्टिकर लावण्याची उस्मान ख्वाजाची मागणी आयसीसीने फेटाळली होती. नेटमध्ये प्रशिक्षण घेत असताना ख्वाजाने पॅलेस्टिनी ध्वजाच्या रंगात “स्वातंत्र्य हा मानवी हक्क आहे” आणि “सर्व जीवन समान आहे” असे संदेश असलेले बूट घातले होते, जे आयसीसीने त्याला पुन्हा घालण्यास बंदी घातली होती.
खरे तर ख्वाजाने पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) आवाहन केले होते की, सामन्यांदरम्यान त्याच्या शूजवर ‘जीवन समान आहे’ आणि ‘सर्वांसाठी स्वातंत्र्य’ छापावे. पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाला त्याचा विरोध. अशा मजकूरासह खेळण्याची परवानगी मागणारा संदेश लिहिला होता, जो आयसीसीने नाकारला होता.
ख्वाजाला संघ आणि क्रिकेट बोर्डाचा पाठिंबा
ख्वाजाला संघाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचा पाठिंबा आहे. पॅट कमिन्स, डेव्हिड वार्नर यांनी त्याचे समर्थन केले आहे.
“Uzzy’s always been a leader around the group” – David Warner throws his support behind his good mate and opening partner #AUSvPAK pic.twitter.com/2ehSLAZZE2
— cricket.com.au (@cricketcomau) December 26, 2023
कमिन्सने म्हटले की, गाझामधील मानवतावादी दुर्दशा अधोरेखित करण्यासाठी सलामीच्या फलंदाजाचे प्रयत्न आक्षेपार्ह नव्हते. आम्ही उझीला खरोखर पाठिंबा देतो, मला वाटते की तो ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी तो उभा आहे आणि मला वाटते की तो ते खरोखर आदरपूर्वक करत आहे.