AUS vs PAK 3rd Day Highlights : मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात चार गडी गमावून 187 धावा केल्या आहेत. कांगारूंची आतापर्यंत एकूण 241 धावांची आघाडी झाली आहे.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 318 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा पहिला डाव 264 धावांवर आटोपला आणि कांगारूंना 54 धावांची आघाडी मिळाली. पावसाने व्यत्यय आणला नाही तर या सामन्याचा निकाल जवळपास निश्चित मानला जात आहे. सध्या तरी ऑस्ट्रेलियाची पकड मजबूत आहे.
6️⃣ wickets between @mirhamza_k and @iShaheenAfridi today 🤝☄️
Australia lead by 241 runs at the end of Day Three 🏏#AUSvPAK pic.twitter.com/RjrwkpewkT
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 28, 2023
पाकिस्तानचा पहिला डाव..
पाकिस्तान संघाने तिसर्या दिवशी पहिला डाव 6 बाद 194 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि 70 धावा जोडल्यानंतर उर्वरित चार विकेट गमावल्या. यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान (42 धावा), आमेर जमाल (33 धावा) आणि त्यानंतर शाहीन शाह आफ्रिदी (21 धावा) यांनी छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या खेळी खेळल्या आणि संघाची धावसंख्या 264 धावांपर्यंत नेली. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात कर्णधार कमिन्सने सर्वाधिक पाच, तर लियॉनने चार विकेट घेतल्या. हेझलवूडला एक विकेट मिळाली.
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव..
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात काही खास नव्हती. संघाने 16 धावांत चार विकेट गमावल्या होत्या. उस्मान ख्वाजा आणि ट्रॅव्हिस हेड खातेही उघडू शकले नाहीत. त्याचवेळी डेव्हिड वॉर्नर सहा धावा करून बाद झाला आणि मार्नस लॅबुशेन चार धावा करून बाद झाला. यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मिचेल मार्श यांनी पाचव्या विकेटसाठी 153 धावांची भागीदारी केली. मार्शने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सातवे अर्धशतक झळकावले. त्याचे शतक हुकले आणि 130 चेंडूंत 13 चौकारांच्या मदतीने 96 धावा करून तो बाद झाला. याशिवाय स्टीव्ह स्मिथ 176 चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने 50 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तो बाद होताच दिवसाचा खेळ संपवण्याची घोषणा करण्यात आली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 6 गडी गमावून 187 धावा केल्या होत्या. अॅलेक्स कॅरी 16 धावांवर नाबाद आहे.
पाकिस्तानकडून शाहीनने दुसऱ्या डावात 3 तर मीर हमजाने 3 बळी घेतले. आता चौथ्या दिवशी पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाला किती धावांवर रोखतो आणि त्यानंतर दुसऱ्या डावात पाकिस्तानचे फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या लक्ष्याचा पाठलाग करू शकतात की नाही हे पाहावे लागेल.