\n

पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला वेगवान गोलंदाजांनाही येथे चांगली साथ मिळाली. शाहीन आफ्रिदीच्या जबरदस्त चेंडूवर डेव्हिड वॉर्नरचा झेल सुटला नसता तर शान मसूदचा हा निर्णय योग्य ठरला असता.  वास्तविक, सामन्याच्या तिसऱ्या षटकातच पाकिस्तानला सुवर्णसंधी मिळाली. येथे डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीनने षटकातील शेवटचा चेंडू जबरदस्त अँगलने स्विंग केला. हा चेंडू वाचण्यात वॉर्नर पूर्णपणे अपयशी ठरला आणि चेंडू त्याच्या बॅटची धार घेऊन थेट स्लिपमध्ये उभ्या असलेल्या अब्दुल्ला शफीककडे गेला. मात्र शफिकने हा सोपा झेल सोडला. डेव्हिड वॉर्नरचा झेल सोडला तेव्हा तो अवघ्या दोन धावांवर होता आणि ऑस्ट्रेलियाच्या धावफलकावर अवघ्या 6 धावा होत्या. नंतर पहिली विकेट घेण्यासाठी पाकिस्तानला बराच वेळ वाट पाहावी लागली.

\n

वॉर्नर आणि ख्वाजा यांनी येथे 95 धावांची भागीदारी केली. 38 धावा करून वॉर्नर आघा सलमानचा बळी ठरला. एकूण 108 धावांवर उस्मान ख्वाजा याला 42 धावांवर हसन अलीने बाद केला. यानंतर स्टीव्ह स्टिम आणि मार्नस लॅबुशेन यांनी डाव पुढे नेला. स्मिथ 26 धावा करून आमेर जमालचा बळी ठरला.

\n

154 धावांवर तिसरी विकेट पडल्यानंतर लॅबुशेन आणि ट्रॅव्हिस यांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत संयमी फलंदाजी केली आणि चौथी विकेट पडू दिली नाही. अशा प्रकारे पाकिस्तानने पहिल्या दिवशी 66 षटकांत 3 गडी गमावून 187 धावा केल्या. लॅबुशेन 44 आणि ट्रॅव्हिस हेड 9 धावांवर नाबाद आहेत. पाकिस्तानकडून हसन अली, सलमान आघा आणि आमेर जमाल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

\n

ऑस्ट्रेलिया मालिकेत 1-0 ने आघाडीवर..

\n

पर्थमध्ये झालेल्या या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पाकिस्तानी संघाने गमावला होता. त्यांना मालिका जिंकायची असेल तर त्याला मेलबर्नमध्ये कोणत्याही किंमतीवर विजय मिळवावा लागेल. दरम्यान, पाकिस्तानचा संघ गेल्या 28 वर्षांपासून ऑस्ट्रेलियात एकही कसोटी जिंकू शकलेला नाही. आजपर्यंत त्यानी येथे एकही मालिका जिंकलेली नाही.

\n

वॉर्नरच्या नावावर खास विक्रम…

\n

38 धावा करूनही वॉर्नरने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला. वॉर्नरने स्टीव्ह वॉला मागे टाकले आहे. स्टीव्ह वॉने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 18,496 धावा केल्या होत्या. त्याचवेळी वॉर्नर आता स्टीव्ह वॉच्याही पुढे गेला आहे. वॉर्नरच्या नावावर सध्या तिन्ही फॉरमॅटसह 18 हजार 502 धावा आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंमध्ये तो आता फक्त रिकी पाँटिंगच्या मागे आहे. पाँटिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 27,368 धावा केल्या आहेत.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"#AUSvPAK 2nd Test Day 1 Stumps : वॉर्नरचा झेल सोडणं पाकला पडलं महागात, पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर; जाणून घ्या,स्कोअरकार्ड…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/12/aus-4.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ausvpak-2nd-test-day-1-stumps-pakistan-toiled-hard-through-the-day-but-have-only-three-wickets-to-show-for-it#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/12/aus-4.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/ausvpak-2nd-test-day-1-stumps-pakistan-toiled-hard-through-the-day-but-have-only-three-wickets-to-show-for-it#webpage","name":"#AUSvPAK 2nd Test Day 1 Stumps : वॉर्नरचा झेल सोडणं पाकला पडलं महागात, पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर; जाणून घ्या,स्कोअरकार्ड…","url":"https://www.dainikprabhat.com/ausvpak-2nd-test-day-1-stumps-pakistan-toiled-hard-through-the-day-but-have-only-three-wickets-to-show-for-it","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ausvpak-2nd-test-day-1-stumps-pakistan-toiled-hard-through-the-day-but-have-only-three-wickets-to-show-for-it#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/12/aus-4.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/ausvpak-2nd-test-day-1-stumps-pakistan-toiled-hard-through-the-day-but-have-only-three-wickets-to-show-for-it#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/ausvpak-2nd-test-day-1-stumps-pakistan-toiled-hard-through-the-day-but-have-only-three-wickets-to-show-for-it","name":"#AUSvPAK 2nd Test Day 1 Stumps : वॉर्नरचा झेल सोडणं पाकला पडलं महागात, पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर; जाणून घ्या,स्कोअरकार्ड…"}}]}}}

#AUSvPAK 2nd Test Day 1 Stumps : वॉर्नरचा झेल सोडणं पाकला पडलं महागात, पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर; जाणून घ्या,स्कोअरकार्ड…