पाच राज्यातील निवडणुकींच्या प्रचारासाठी राजकीय नेत्यांनी कंबर कसली आहे. अनेक ठिकाणी घेतल्या जाणाऱ्या सभेतून राजकीय नेते आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi)आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवली आहे.
भाजपच्या तक्रारीनंतर कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.या नोटिशीला उत्तर देण्यासाठी आयोगाने प्रियांका गांधी यांना १६ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. भाजपा नेत्यांनी केलल्या तक्रारीत प्रियंका गांधींनी मध्य प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी काही वक्तव्यं केली होती. त्याला सत्याचा कुठलाही आधार नव्हता ती वक्तव्यं खोटी होती. खासगीकरणावरुन त्यांनी हे आरोप केले होते, असे म्हंटले आहे.
आम आदमी पक्षाने नरेंद्र मोदींना टार्गेट करत चुकीचा व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओच्या विरोधात भाजपाने तक्रार केली होती. ज्यानंतर निवडणूक आयोगाने आप या पक्षालाही नोटीस बजावत १६ नोव्हेंबरला संध्याकाळपर्यंत उत्तर देण्यास निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
तर सोशल मीडियावर आम आदमी पक्षातर्फे म्हणजेच आपतर्फे एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडीओच्या विरोधात भाजपाने तक्रार केली होती. ज्यानंतर निवडणूक आयोगाने आप या पक्षालाही नोटीस बजावली आहे. १६ नोव्हेंबरच्या दिवशी संध्याकाळपर्यंत उत्तर द्यावं असंही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच भाजप नेत्याच्या या तक्रारीनंतर प्रियंका गांधी आणि अरविंद केजरीवाला यांना निवडणूक आयोगाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.