Gold Silver price : दिवाळीनिमित्त सोने खरेदीची आपल्याकडे परंपरा आहे. यंदा देखील ही परंपरा कायम राखत देशवासीयांनी सोने खरेदी केल्याचे दिसून आले. दरम्यान, आज भाऊबीज निमित्ताने बहिणीसाठी भेट म्हणून सोन्याचा दागिना देण्याचा मान असतो. मात्र त्याअगोदर आजचे सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या.
आज सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. देशात सोन्याचा भाव 24 कॅरेटसाठी 60,600 रुपये आणि 22 कॅरेटसाठी 55,550 रुपये आहे. गुड रिटर्न्सनुसार, आज 15 नोव्हेंबरला प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
तर, 22 कॅरेट सोन्याची किंमत (Gold Price ) 55,550 रुपये आहे.18 कॅरेट सोने खरेदीची किंमत 45,450 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
आज सोन्याप्रमाणे आज चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीचा भाव आज 600 रुपयांनी वाढला असून आजचा दर 73,000 रुपये प्रति किलो आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत चांदीच्या दरात 600 रुपयांनी घट झाली आहे. चांदीच्या दरात घसरण होत आहे.