नवी दिल्ली – करोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी राज्यांची आढावा बैठक घेतली यावेळी त्यांनी सर्व राज्यांना इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केले आहे. मोदींनी बिगरभाजपशासित राज्यांवर टीका देखील केली. यावर आता काँग्रेस पक्षाने मोदी सरकारवर ट्विट करत टीका केली आहे.
एखाद्याने किती ढोंगी असावं?
काँग्रेसच्या काळात ३ रुपये असलेली एक्सईज ड्युटी मोदींनी 32 रुपये केली आणि आता तेच इतरांना पेट्रोलवरचा टॅक्स कमी करायला सांगतायत!
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 27, 2022
कॉंग्रेसने ट्विट करत टोला लगावला आहे की,’एखाद्याने किती ढोंगी असावं? काँग्रेसच्या काळात ३ रुपये असलेली एक्सईज ड्युटी मोदींनी 32 रुपये केली आणि आता तेच इतरांना पेट्रोलवरचा टॅक्स कमी करायला सांगतायत!’ असं ही म्हंटले आहे.
High Fuel prices – blame states
Coal shortage – blame states
Oxygen shortage – blame states68% of all fuel taxes are taken by the centre. Yet, the PM abdicates responsibility.
Modi’s Federalism is not cooperative. It’s coercive.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 28, 2022
दरम्यान, याच मुद्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘इंधन दरवाढ, कोळशाची टंचाई, ऑक्सिजनची टंचाई या सर्व गोष्टींसाठी राज्यांना दोष द्यायचा. केंद्र सरकार इंधनावरील ६८ टक्के कर घेतेय. तरीही पंतप्रधान मोदी जबाबदारी झटकतात. मोदींचा संघवाद हा सहकारी नसून जबरदस्तीचा आहे’ असं म्हणत राहुल गांधींनी टीका केली आहे.