मुंबई – गृहखात्याकडून गेल्या काही दिवसापुर्वी राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या होत्या यामध्ये पिंपरी-चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा सुद्दा समावेश होता. कृष्ण प्रकाश यांची पिंपरी-चिंचवड येथून बदली करून त्यांना सध्या व्हीआयपी सुरक्षेच्या पोलीस महानिरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र तडकाफडकी झालेल्या या बदली मुळे कृष्ण प्रकाश चांगलेच नाराज असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केल्याच्या चर्चा होऊन लागल्या अशातच कृष्ण प्रकाश यांनी एक सूचक पोस्ट इंस्टाग्रामवर टाकली आहे.
आयपीएस कृष्ण प्रकाश यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकली या पोस्टमध्ये ते शेरोशायरीमधून व्यक्त झाले आहे. पोस्टमद्ये ते लिहितात ‘मेरे पसीने से मेरे मेहनत की खुशबू आती है! मेरा लहू मेरे रगो मैं इमान का रंग भरता है! ऐ दौर की दुश्वारिया युं न इतरा मेरे हालात पे! वक्त तो वक्त है, आता और जाता है!,’ अशा आशयाची पोस्ट त्यांनी टाकली आहे. त्यांच्या या पोस्टनंतर बदली झाल्यामुले चांगलेच नाराज असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची बाहेर चर्चा होऊन लागली. ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीला स्थगिती मिळाली तशी त्यांच्या बदलीला स्थगिती मिळेल अशी आशा त्यांनी होती मात्र पवार यांच्या भेटीतून कृष्ण प्रकाश यांच्या हाती काहीच लागले नसल्याचे दिसून आले. असे जरी असले तरी कृष्ण प्रकाश यांनी आपली नाराजी जाहिरपणे कधीच उघडपणे बोलून दाखवली नाही. मात्र आता ते सोशल मिडियाचा आधार घेऊन नाराजी व्यक्त करताना दिसून येत आहेत.