मुंबई – सध्या देशात लॉकडाउनचा दुसरा टप्पा सुरु आहे. हा लॉकडाउन येत्या तीन मे रोजी संपणार आहे. पण मुंबई, पुण्यामध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे या दोन शहरात १८ मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी एका माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
त्यामुळे कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्याकरिता मुंबई आणि पुणे या दोन शहरात लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो.