पुणे- तंबाखूजन्य पदार्थांचा अवैधरित्या साठा करुन ठेवलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करुन पोलिसांनी पावणेआठ लाखांचा साठा जप्त केला. नNहे परिसरात ही कारवाई करण्यात आली. यामध्ये गुटखा, पान मसाला, आरएमडी अशा तंबाखूजन्य पदार्थांचा समावेश आहे.
विमलकुमार सुखराज जैन (४५, नNहे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलिसांचे खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथक धायरी भागात गस्तीवर होते. यावेळी नNहे भागातील साडी सेंटरच्या दुकानात तंबाखूजन्य पदार्थांचा साठा असल्याची माहिती मिळाली. यानूसार पोलिसांनी छापा टावूâन ७ लाख ८१ हजार ८२५ रुपयांचा साठा जप्त केला. जैन याच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.