दिघी-आळंदी रस्त्यावर पुन्हा ‘तोच’ प्रकार

आणखी एका तरुणावर विनयभंगाचा गुन्हा

पिंपरी : दिघी-आळंदी रोडवर चालणाऱ्या अनधिकृत वेश्‍या व्यवसायाचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दिघी पोलीस ठाण्यात एका महिलेने या रोडवर वारंवार सामान्य महिलांना नागरिकांच्या विकृत वागणुकीला सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. पीडितेलाही अशाच घटनेला सामोरे जावे लागल्याने तिने तक्रार दिली असून पोलिसांनी तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

रितेश चावडा (रा. कोथरूड) असे आरोपीचे नाव आहे. दिघी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही 17 एप्रिल रोजी त्यांची दुचाकी घेऊन दुरुस्तीसाठी जात असताना दिघी आळंदी रोडवरील आशियाना लॉज मधून आरोपी बाहेर आला व त्याने पीडितेला लॉजमध्ये सोबत येण्यास सांगितले.

यावरून त्याला पीडिता ओरडली असता त्याने पुन्हा अश्‍लिल हावभाव करत तिचा विनयभंग केला. यापूर्वीही अशा अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता तरी या लॉजवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.