पुणे – कारागृहातून जामिनावर सोडलेल्या एका कच्च्या कैद्याचा पुणे स्टेशनच्या जहाँगीर हॉस्पिटल जवळील पुलाच्या फुटपाथवर झोपल्यानंतर अज्ञातानी शस्त्राने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुन्ना ईश्वर चव्हाण (वय 23, रा. शास्त्रीनगर बीड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुन्ना याच्यावर पुणे रेल्वे पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्यामुळे तो येरवडा कारागृहात होता. करोना व्हायरचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील कारागृहातून सात वर्षेपेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यातील कैद्यांना तात्पुरत्या जामीनावर सोडण्यात येत आहे. यामध्ये मुन्ना याला देखील कोर्टाच्या आदेशानुसार जामिनावर चार ते पाच दिवसांपूर्वी सुटका करण्यात आली होती. तो फुटपाथवर राहत होता.