अश्‍लील चाळे; तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

पिंपरी -अश्‍लील इशारे करीत तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.17 ) रात्री आठच्या सुमारास भोसरी येथे घडला.

या प्रकरणी तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, धरमराज श्रीराम चौहान (22, रा. आदिनाथनगर, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी तरुणी दरवाजामध्ये उभी असताना आरोपीने तिच्याकडे पाहून अश्‍लील चाळे केले. तसेच याबाबत कुणाला न सांगण्याचे इशारे करीत तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादी म्हटले आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.