पालिका कर्मचाऱ्याचे ओळखपत्र घेऊन फिरणाऱ्यांवर गुन्हा

सातारा  – अत्यावशक सेवेत नसतानाही सातारा पालिकेच्या कर्मचाऱ्याचे ओळखपत्र घेऊन शहरातून विनाकारण फिरणाऱ्या वरद नंदकुमार चक्के व अमेय दिलीप जगताप (रा. सोमवार पेठ, सातारा) यांच्यावर जमावबंदी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार वैशाली गुरव यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी, वैशाली गुरव या इतर कर्मचाऱ्यांसमवेत राधिका रोड परिसरात गस्त घालत असताना दोन युवक दुचाकीवरून (एमएच-11-सीपी-5433) वरुन निघाले होते. त्यांना पोलिसांनी थांबवून बाहेर फिरण्याचे कारण विचारले असता, वरद याने सातारा नगरपालिकेच्या शीघ्र प्रतिसाद पथकातील भालचंद्र डोंबे यांचे ओळखपत्र दाखवून पेट्रोल भरण्यासाठी निघाल्याचे
सांगितले. पोलिसांना संशय आल्याने त्याच्याकडे आधारकार्डची मागणी केली असता, त्याने ते दाखवण्यास नकार दिला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता दोघांनी पालिका कर्मचाऱ्याच्या ओळखपत्राचा गैरवापर केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.