पुणे, – रोहित शर्माच्या क्रिककींगडम क्रिकेट अकादमी यांच्या वतीने आयोजित क्रिककींगडम चॅम्पियन्स करंडक 16 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत इमर्जिंग गटात सिंगापुर स्ट्रायकर्स संघाने पाच विजयासह गुणतालिकेत अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
सहारा क्रिकेट मैदान, व्हिजडम क्रिकेट मैदान व वीरांगना क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत अखेरच्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना ओडीएम ब्लास्टर्स संघाने २० षटकात ५ बाद ११५ धावा केल्या. यात रामस्वरूप भूयन नाबाद ३४, गुरु प्रसाद राऊत्री नाबाद ३१, राज पंजाबी २५ यांनी धावा केल्या.
सिंगापूर स्ट्रायकर्सकडून अर्जुन राठोड (२-१२), कृतिन बालसुब्रमण्यम (१-१५), पार्थ मनहस (१-१९) यांनी सुरेख गोलंदाजी केली. याच्या उत्तरात सिंगापुर स्ट्रायकर्स संघाने १७.५ षटकात ७ बाद ११६ धावा करून हे आव्हान पुर्ण केले. यात क्रिशय धारने ५० चेंडूत ८ चौकारासह नाबाद ५२ धावा काढून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
IND vs SA Test Series : दक्षिण आफ्रिकेत ‘अशी ‘कामगिरी करणारा भारत ठरला पहिला आशियाई संघ…
सिंगापूर स्ट्रायकर्स संघाने ६ सामन्यात ५ विजय व एक पराभवासह अव्वल क्रमांक पटकावला. तर, क्रिशू नाईटस संघाने ४ विजय व २ पराभवासह उपविजेतेपद पटकावले. स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण डेव वाटमोर, कौशिक आफळे, समद फल्लाह आणि स्वप्निल पोखरकर यांच्या हस्ते करण्यात आले.