पुणे – रोहित शर्माच्या क्रिककींगडम क्रिकेट अकादमी यांच्या वतीने आयोजित क्रिककींगडम चॅम्पियन्स करंडक १६ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत सीके पुणे प्रेडीएटर्स, पृथ्वी सेंच्युरियन्स, २२ यार्डस या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.
सहारा क्रिकेट मैदान व वीरांगना क्रिकेट मैदनावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत ईशान लोया (२-२१ व नाबाद ६३धावा) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पृथ्वी सेंच्युरियन्स संघाने सहारा क्रीककींगडम संघाचा ८ गडी राखून पराभव केला.
Sports In Pune : क्रिककींगडम चॅम्पियन्स करंडकात 13 संघ सहभागी…
दुसऱ्या सामन्यात जय दानवले(५८ धावा व १-७) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर २२ यार्डस संघाने क्रिकेट लाईफ फाल्कन्स संघाचा ३३ धावांनी पराभव केला. अन्य लढतीत पंकज शर्मा नाबाद ८३ धावांच्या जोरावर सीके पुणे प्रेडीएटर्स संघाने क्रिककींगडम थंडरबोल्ट संघाचा ८ गडी राखुन पराभव करून विजयी सलामी दिली.