Sports In Pune – शतकाहूनही अधिक काळ क्रीडा क्षेत्रात आघाडीवर असलेल्या डेक्कन जिमखान्याच्या त्रैवार्षिक निवडणुकीत क्लबचे सरचिटणीस (जनरल सेक्रेटरी) पदावर उद्योजक मिहीर केळकर यांची तर अर्थसचिव (फायनान्स सेक्रेटरी) पदावर सीए गिरीश इनामदार यांची बिनविरोध निवड झाली.
या निवडणुकीत उभ्या असलेल्या ट्राॅफी पॅनेलचे सर्वच्या सर्व म्हणजे २९ सदस्य निवडून आले. या २९ पैकी २७ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. एकाच पॅनेलचे सर्व उमेदवार निवडून येण्याची ही क्लबच्या इतिहासातली पहिली घटना आहे.
या निवडणुकीसाठी अॅड. रोहित एरंडे, सिद्धार्थ साठे आणि सीए देवकरण भळगट यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. या निवडणुकीत निवडली गेलेली कार्यकारीणी पुढील तीन वर्षे क्लबचे कामकाज पाहणार आहे.