पुणे – रोहित शर्माच्या क्रिककींगडम क्रिकेट अकादमी यांच्या वतीने आयोजित क्रिककींगडम चॅम्पियन्स करंडक १६ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत १३ संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा सहारा क्रिकेट मैदान येथे होणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना क्रिककींगडमचे मुख्य कार्यकारी अधिकारी चेतन सुर्यवंशी यांनी सांगितले की, स्पर्धेत सीके पुणे प्रेडीएटर्स, क्रिककींगडम थंडरबोल्ट, काँटीनेंटल सुपर किंग्ज, २२ यार्डस, क्रिशू नाईट्स, ओडीएम ब्लास्टर्स, ओडीएम ग्लाडीएटर्स, पृथ्वी सेंच्युरियन्स, सहारा डायनामोज, सहारा वॉरियर्स, सिंगापुर स्ट्रायकर्स, एसपीजी स्पार्टन्स, क्रिकेट लाईफ फाल्कन्स हे संघ झुंजणार आहेत.
स्पर्धेचे सामने साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर यांना देखील आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत.