प्रथम व्हिन्टेज आयटी कप स्पर्धा : रोमहर्षक लढतीत ग्लोबलचा विजय

पुणे – अखेरपर्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत एफआयएस ग्लोबल संघाने झेन्सर संघावर सहा धावांनी मात करत येथे होत असलेल्या प्रथम व्हिन्टेज आयटी कप टी-20 क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली.

कटारिया हायस्कूलच्या मैदानावर ही लढत झाली. एफआयएस ग्लोबल संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 126 धावा केल्या. यात प्रशांत पोळने 17 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकारांसह 34 धावा करत संघाला 126 धावांची मजल मारुन दिली. 127 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या झेन्सर संघाची सुरूवात झाल्यानंतर मधल्या फळीतील सिद्धार्थ जलन, अकिब पीरझादे, अमित जाधव यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही तिघे बाद झाल्यानंतर मधल्याफळीतील फलंदाजांनी खराब कामगिरी केल्याने झेन्सरचा डाव 19.5 षटकांत 120 धावांत आटोपल्याने त्यांना सहा धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

तर, दुसऱ्या सामन्यात डॉश्‍चे बॅंकच्या संघाचा पराभव करत पीटीसीच्या संघाने स्पर्धेत आगेकूच नोंदवली. यावेळी डॉश्‍चे बॅंकच्या संघाने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 149 धावांचीमजल मारत पीटीसीसंघासमोर विजयासाठी 150 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात खेळताना पीटीसीच्या संघाने हे आव्हान 17.4 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यात पार करत सामना 8 गडी राखून आपल्या नावे केला.

तिसऱ्या सामन्यात परसिस्टन्सच्य संघाचा पराभव करत एहएसबीसीच्या संघाने आगेकूच नोंदवली. यावेळी परसिस्टन्सच्या संघने 20 षटकांत 9 गडी गमावून 126 धावांची मजल मारत एचएसबीसीच्या संघासमोर विजयासाठी 127 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात खेळताना एचएसबीसीच्या संघाने हे आव्हान अखेरच्या चेंडूवर पुर्ण करत आगेकूच नोंदवली.

अखेरच्य सामन्यात आयडीयाजच्या संघाचा पराभव करत टेक महिंद्राच्या संघाने स्पर्धेत आगेकूच नोंदवली. यावेळी आयडीयाजच्या संघाने निर्धारित 20 षटकांत 8 बाद 111 धावांची मजल मारली होती. प्रत्युत्तरात खेळणाऱ्या टेक महिंद्राच्या संघाने हे आव्हान 14.3 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात पुर्ण करत स्पर्धेत आगेकूच नोंदवली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.