IND vs ENG 3rd Test Day 4 Live Cricket Score : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला. त्यामुळे टीम इंडियाकडे 126 धावांची आघाडी होती. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात चार विकेट गमावत 430 धावा केल्या आणि डाव घोषित केला. इंग्लंडला 557 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. सामना रोमांचक टप्प्यात पोहोचला आहे.
IND vs ENG Live : इंग्लंडला पराभवाच्या उंबरठ्यावर…
इंग्लंडला 24.4 षटकात 50 च्या स्कोअरवर सातवा धक्का बसला. रेहान अहमदला कुलदीपने सिराजच्या हाती झेलबाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. कुलदीपने यापूर्वी बेन स्टोक्सला पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. त्याचबरोबर जडेजाने पोप, रूट आणि बेअरस्टो यांना बाद केले आहे. भारतीय गोलंदाजी पाहता आजच सामना संपण्याची शक्यता आहे.
3RD Test. WICKET! 24.4: Rehan Ahmed 0(5) ct Mohammed Siraj b Kuldeep Yadav, England 50/7 https://t.co/FM0hVG5X8M #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) February 18, 2024
इंग्लंडला पहिला धक्का 15 धावांवरच बसला. यष्टिरक्षक ध्रुव जुरेलच्या शानदार क्षेत्ररक्षणामुळे भारताने डकेटला धावबाद केले. डकेटला चार धावा करता आल्या. इंग्लंडला दुसऱ्या डावात 18 धावांवर दुसरा धक्का बसला. जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर जॅक क्रोली एलबीडब्ल्यू आऊट झाला. त्यानंतर 20 च्या स्कोअरवर इंग्लंडला तिसरा धक्का बसला. जडेजाने ओली पोपला स्लिपमध्ये रोहितकरवी झेलबाद केले. त्याला तीन धावा करता आल्या. इंग्लंडला 28 च्या स्कोअरवर चौथा धक्का बसला. पोपला बाद केल्यानंतर जडेजाने सध्या फॉर्म नसलेल्या जॉनी बेअरस्टोला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. बेअरस्टोला चार धावा करता आल्या.
इंग्लंडला 50 धावांवर पाचवा धक्का बसला. रवींद्र जडेजाच्या फिरकीत इंग्लिश फलंदाज अडकले आहेत. जडेजाने ऑली पोप, जॉनी बेअरस्टो आणि आता जो रूटला पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. रुट सात धावा करून बाद झाला. इंग्लंडला 50 धावांवर सहावा धक्का बसला. कुलदीप यादवने कर्णधार बेन स्टोक्सला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला 15 धावा करता आल्या.
जैस्वाल, सर्फराज अन् गिलची ‘यशस्वी’ खेळी….
तत्पूर्वी, यशस्वी जैस्वाल दुसऱ्या डावात 236 चेंडूत 14 चौकार आणि 12 षटकारांसह 214 धावांवर नाबाद राहिला. त्याचवेळी सर्फराजने 72 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 68 धावांची खेळी केली. दोघांमध्ये 158 चेंडूत 172 धावांची तुफानी भागीदारी झाली जी नाबाद होती.
कसोटी इतिहासात एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग कधीच झाला नव्हता. अशा स्थितीत ‘बेझबॉल’साठी प्रसिद्ध असलेला इंग्लिश संघ धावांचा पाठलाग करणार की कसोटी ड्रॉ करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
तत्पूर्वी आज भारताच्या दुसऱ्या डावात शुभमन गिल 91 धावा करून बाद झाला तर कुलदीप यादव 27 धावा करून बाद झाला. तर, शनिवारी रोहित शर्मा 19 धावांवर आणि रजत पाटीदार खाते न उघडताच बाद झाला.
इंग्लंडकडून रूट, हार्टले आणि रेहान यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. अश्विनही आज टीम इंडियामध्ये सामील होणार आहे. अशा परिस्थितीत इंग्लंडसाठी परिस्थिती सोपी जाणार नाही.