IND vs ENG 3rd Test Day 4 Live Cricket Score : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे. सामना रोमांचक टप्प्यात पोहोचला आहे.
टीम इंडियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला. त्यामुळे टीम इंडियाकडे 126 धावांची आघाडी होती. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात चार विकेट गमावत 430 धावा केल्या आणि डाव घोषित केला. इंग्लंडला 557 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
A mighty impressive batting display from #TeamIndia! 💪 💪
2⃣1⃣4⃣* for Yashasvi Jaiswal
9⃣1⃣ for Shubman Gill
6⃣8⃣* for Sarfaraz KhanScorecard ▶️ https://t.co/FM0hVG5pje#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/xYB1A6vgUY
— BCCI (@BCCI) February 18, 2024
यशस्वी जैस्वाल दुसऱ्या डावात 236 चेंडूत 14 चौकार आणि 12 षटकारांसह 214 धावांवर नाबाद राहिला. त्याचवेळी सर्फराजने 72 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 68 धावांची खेळी केली. दोघांमध्ये 158 चेंडूत 172 धावांची तुफानी भागीदारी झाली जी नाबाद होती.
कसोटी इतिहासात एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग कधीच झाला नव्हता. अशा स्थितीत ‘बेझबॉल’साठी प्रसिद्ध असलेला इंग्लिश संघ धावांचा पाठलाग करणार की कसोटी ड्रॉ करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Ishan Kishan : फटकारल्यानंतरही इशानचा ‘बीसीसीआय’शी पुन्हा पंगा; BCCI मोठी कारवाई करणार का?
तत्पूर्वी आज भारताच्या दुसऱ्या डावात शुभमन गिल 91 धावा करून बाद झाला तर कुलदीप यादव 27 धावा करून बाद झाला. तर, शनिवारी रोहित शर्मा 19 धावांवर आणि रजत पाटीदार खाते न उघडताच बाद झाला.
इंग्लंडकडून रूट, हार्टले आणि रेहान यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. अश्विनही आज टीम इंडियामध्ये सामील होणार आहे. अशा परिस्थितीत इंग्लंडसाठी परिस्थिती सोपी जाणार नाही.