मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ही मालिका महाराष्ट्रातील घराघरात पोहचली आहे. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
अभिनेत्री ‘अक्षया देवधर’ म्हणजेच हिची ही पहिलीच मालिका असून पाठक बाई म्हणून तिने या मालिकेतून लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. मालिकेत अक्षया रसिकांना नेहमीच सोज्वळ रुपात दिसत असते. त्यामुळे अल्पावधीतच तिने रसिकांची मनं जिंकली.
दरम्यान, अक्षया सोशल मीडियावर नेहमीच बरीच एक्टिव्ह असते. आपले फोटो आणि व्हिडिओ ती आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. नुकतंच लोकडाऊनच्या काळात अक्षयाने आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात तिचा साधा आणि सोज्वळ अंदाजात दिसत येत आहे. सध्या तिच्या या फोटोंवर कमेंटस आणि लाईक्सचाही वर्षाव झाला होता.