मला लहानपणापासून तांडव नृत्य आवडते – राम यशवर्धन

छोट्या पडद्यावर गेल्या काही वर्षांपासून पौराणिक साहित्यावर आधारित मालिकांचा ट्रेंड सुरू झाला आहे. विविध देवदेवता, महाकाव्ये, ऐतिहासिक व्यक्‍ती यांवर आधारलेल्या या मालिकांना प्रेक्षकवर्गही चांगला लाभत आहे. लॉकडाऊनच्या काळात रामायण, महाभारत, कृष्णा, चाणक्‍य यांसारख्या मालिकांचे पुनःप्रक्षेपण करण्यामागे चाहत्यांची हीच आवड होती.

 

लॉकडाऊनच्या पूर्वीपासून एनडीटीव्हीवर सुरु असलेल्या “कहत हनुमान जय श्रीराम’ या मालिकेचीही सध्या चांगली चर्चा आहे. या मालिकेमध्य महादेवाची व्यक्‍तिरेखा अभिनेता राम यशवर्धन साकारत आहे. नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य दिनी या कार्यक्रमाच्या सेटवर रामला एक अनोखा अनुभव आला.

महादेवाची भूमिका करणाऱ्या रामला तांडव नृत्य मनापासून आवडते. विशेष म्हणजे या दिवशी तो 48 तास नृत्य करत होता. तुम्ही म्हणाल “”काय?” पण हो हे खरे आहे. या डान्सचा सिक्‍वेन्स दोन दिवस चालला आणि राम सीनच्या मागणीनुसार भरपूर उत्साहाने आणि आक्रमकतेने नृत्य करत राहिला.
आपल्या तांडव नृत्यप्रेमाविषयी बोलताना राम म्हणतो, मला लहानपणापासून एक कला म्हणून तांडव नृत्य खूप आवडते. हा एक ताकदवान नृत्यप्रकार आहे. यामध्ये भगवान शिवांच्या तीव्र भावना व्यक्‍त होतात.

“कहत हनुमान जय श्रीराम’ या मालिकेतील एका दृश्‍यासाठी मला 7 मिनिटांचा डान्स फरफॉर्मन्स करायचा होता. पण यासाठी मी 48 तास शूटिंग करत होतो. यामध्ये थोडा-थोडा ब्रेक घ्यायचो. अत्यंत थकवणारी ही प्रक्रिया होती; परंतु मला मिळालेला अनुभव हा अद्वितीय होता ! एक डान्सर म्हणून असा अनुभव मिळणे दुर्मिळ असते !

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.