मुक्या सोबत्यांसोबत रममाण

बॉलीवूडची सध्याची आघाडीची अभिनेत्री दिशा पटनी आपल्या बोल्ड छायाचित्रांमुळे नेहमीच चर्चेत असते. लॉकडाऊनमुळे दिशा सध्या अन्य सेलीब्रेटींप्रमाणेच घरामध्ये बंदिस्त आहे. प्रत्येक कलाकार घरात राहून कोणत्या ना कोणत्या माध्यमातून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहे; पण दिशा मॅडम मात्र आपल्या पक्षी-प्राण्यांच्या विश्‍वात गढून गेली आहे. अलीकडेच एका मुलाखतीमध्ये तिने यासंदर्भात खुलासा केला आहे. दिशा म्हणते की, माझ्या आसपास इतके पशुपक्षी आहेत की मला एखाद्या प्राणीसंग्रहालयात राहिल्यासारखे वाटते !

दिशा सांगते की, मी या मुक्‍या प्राण्यांसोबत वेळ घालवत आहे आणि मी खूप खुश आहे. माझ्याकडे दोन मांजरी आहेत. एकीचे नाव स्वीटी आहेआणि दुसरीचे जास्मीन. याखेरीज माझ्याकडे गोपू आणि बेला नावाचे दोन कुत्रेही आहेत.’

विशेष म्हणजे दिशाकडे गरुडपक्षीही आहे. आपल्या घराच्या एअर कंडिशनच्या कॉम्प्रेसरच्या मागे त्याने घरटे बनवले आहे. दिशा सांगते, त्याची पिल्ले खूप गोड दिसतात.’ अशा सगळ्या “दोस्तां’सोबत दिशा लॉकडाऊनचा काळ छान घालवते आहे. वर्कफ्रंटबाबत बोलायचं तर दिशा येणाऱ्या काळात “राधे ः योर मोस्ट वॉंटेड भाई’ या चित्रपटातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत ती झळकणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.