नवी दिल्ली – करोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनने जगभरात दहशद पसरविली आहे. मात्र भारतात करोनाचे नवीन रुग्ण कमी होताना दिसून येत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून करोनाचे दररोजचे आकडे 10 हजारांपेक्षा कमी येत आहेत. देशात गेल्या 24 तासांत करोनाची 8 हजार 309 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. याशिवाय 9 हजारापेक्षा जास्त लोक करोनापासून मुक्त झाले आहेत. मात्र, या कालावधीत 236 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यासोबतच सक्रिय रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. ही आनंदाची बाब आहे.
COVID19 | India reports 8,309 new cases, 236 deaths & 9,905 recoveries in the last 24 hours; Active caseload at 1,03,859; lowest in 544 days: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/8mTR4VZXPe
— ANI (@ANI) November 29, 2021
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात करोनाचे 1 लाख 3 हजार 859 सक्रिय रुग्ण नोंदवले गेले आहेत. हा आकडा 544 दिवसांनंतरचा सर्वात कमी आहे. त्याचबरोबर 3 कोटी 40 लाख 81 हजार 183 लोक करोनामुक्त झाले आहेत. तर एकूण 3 कोटी 42 लाख 71 हजार 175 करोना रुग्णांची नोंद झाली आहे.
भारतात आतापर्यंत 4 लाख 68 हजार 790 लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, करोनाच्या नवीन व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. भारतातही करोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.