नवी दिल्ली – हॉलीवूडमधील मिस्टर बीन हे प्रचंड लोकप्रिय पात्र रंगवणारा हास्य अभिनेता रोवन अटकिन्सन यांच्या मृत्यूची अशीच एक अफवा अलीकडच्या काळात पसरली होती. सोशल मीडियावर पसरलेल्या या अफवेमुळे मिस्टर बीनच्या चाहत्यांना खूपच वाईट वाटले होते.
ट्विटरवर एक लिंक व्हायरल झाली होती. फॉक्स न्यूज सारखी वाटणाऱ्या एका वेबसाईटची ही लिंक होती. त्यामध्ये रोवन अटकिन्सन यांच्या निधनाची खोटी बातमी होती. रोवन अटकिन्सन यांचा कार अपघातात मृत्यू झाला, असे त्या खोट्या बातमीत म्हटले होते. आणखीन एका ट्विटमध्ये याची सविस्तर माहितीही देण्यात आली होती.
अटकिन्सन यांचा 18 मार्च 2017 मध्ये अपघात झाला होता. त्या अपघातात जखमी झालेल्या 58 वर्षीय अटकिन्सन यांचा मृत्यू झाल्याचे या ट्विटमध्ये म्हटले होते. मात्र 2017 साली अटकिन्सन 62 वर्षांचे होते. ते एकदम सुखरुप आहेत आणि आपल्या पुढच्या प्रोजेक्टची तयारी करत असल्याचे त्यांच्यावतीनेच नंतर जाहीर केले गेले.