#covid vaccine : करोना लसीसोबत ‘सोन्याची नथ’ गिफ्ट; गुजरातमध्ये नागरिक मालामाल

मुंबई – सध्या देशासह राज्यात सुद्धा करोनाचा प्रभाव झपाट्यापे वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित सापडत आहे. करोनची हीच दुसरी लाट रोखण्यासाठी सर्वच राज्यांनी करोनाचे लसीकरण वेगाने वाढविले आहे. तर काहीजण करोना लसीचे दुष्परिणाम असल्याचे पाहून लस घेण्यास टाळाटाळ करत आहे.

अश्यातच आता नागरिकांनी लवकरात लवकर करोना लस घ्यावी यासाठी गुजरातच्या सोनारांनी भन्नाट आयडिया लढविली आहे. करोना लसीकरण केंद्रामध्ये येणाऱ्या नागरिकांना एक खास गिफ्ट देण्यात येत आहे. गुजरातमधील राजकोट भागामध्ये हे स्पेशल गिफ्ट देण्यात येत आहे. महिलांनी करोना लस टोचू घेतल्यानंतर त्यांना सोन्याची नथ गिफ्टम्हणून दिली जात आहे. तर पुरुषांना हँडब्लेंडर देण्यात येत आहे.

राजकोटमधील ज्वेलर असोसिएशनने स्वतःहून पुढाकार घेत हा कँम्प लावला आहे. सध्या देशासह अनेक राज्यांमध्ये करोना या घातक विषाणूने पुन्हा एकदा आपले पाय घट्ट करण्यास सुरुवात केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.