विद्युत जमवालने फोटोग्राफरला गिफ्ट दिले 40 हजारांचे जॅकेट

विद्युल जमवाल ऍक्‍शन हिरो म्हणून ओळखला जातो. पण तो ऍक्‍शन हिरो म्हणून लोकप्रिय आहे, तितकाच तो दिलदार कलाकारही आहे, हे फार कमी जणांना माहिती असेल. विद्युत जमवालचा एक व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल होतो आहे. त्यामध्ये तो बाईकवर बसून निघालेला आहे. त्याने डोक्‍यावर हेल्मेट घालताच एक फोटोग्राफर त्याच्या जवळ येतो आणि त्याची चौकशी करतो.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidyut Jammwal (@mevidyutjammwal)

एवढेच नव्हे तर तो फोटोग्राफर विद्युतच्या जॅकेटचे कौतुकदेखील करतो. हे ऐकल्यावर विद्युत थांबतो. खांद्यावरील सॅक उतरवतो आणि क्षणाचाही विचार न करता आपले महागडे जॅकेट काढून त्या फोटोग्राफरच्या हातात देतो. या फोटोग्राफरनेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून विद्युतच्या दर्यादिलीचे उदाहरण लोकांसमोर आणले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidyut Jammwal (@mevidyutjammwal)

विद्युत जमवालने फोटोग्राफरला जे जॅकेट दिले ते स्पेशल कन्डिशन्ड आहे आणि त्याची किंमत तब्बल 40 हजार रुपये आहे. जॅकेट काढल्यावर विद्युत जमवालची बॉडीही प्रेक्षकांसमोर दिसते आणि त्याला ऍक्‍शन हिरो म्हणून का म्हणतात, हे समजते.

विद्युत जमवालने “कमांडो’ सिरीजमध्ये काम केले आहे. याशिवाय “बुलेट राजा’ आणि “जंगल’सारख्या सिनेमांमधूनही त्याने ऍक्‍शन रोल केले आहेत. “द पॉवर’ मध्ये विद्युत जमवाल आणि श्रेया हासन देखील दिसले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.