बंगळुरू – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत केजीएफ 2 चित्रपटातील एक गाणे वाजवले जात असून हा कॉपीराइटचे उल्लंघन करण्याचा प्रकार असल्याची टीका करत एका म्युझिक कंपनीने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. त्यावर कॉंग्रेस पक्षाचे आणि भारत जोडो यात्रेचे ट्वीटर अकाउंट ब्लॉक केले जावे असे आदेश कर्नाटकातील एका न्यायालयाने आज दिले.