ICC – टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये आतापर्यंत पंचांच्या निर्णयाबाबत बरीच चर्चा झाली आहे. भारत-पाकिस्तान सामन्यातील नो-बॉलचा निर्णय असो किंवा पाकिस्तान बांगलादेश सामन्यात शाकिब अल हसनच्या बाद होण्याचा निर्णय असो. पंचांच्या निर्णयामधील चुकाही अनेकवेळा समोर आल्या आहेत. अशा स्थितीत आता सेमीफायनलच्या महत्वाच्या सामान्यांसाठी पंच कोण असणार असा प्रश्न चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे. कारण या सामान्यांसाठी योग्य पंच असल्यास कोणत्याही संघाला चुकीच्या निर्णयांचा फटका सहन बसणार नाही.
विराट कोहली ठरलाय ICCचा ‘प्लेयर ऑफ द मंथ’; विरोधी संघांसाठी धोक्याची घंटा!
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे आयसीसीने ( ICC ) सोमवारी सेमीफायनलच्या सामन्याबाबत पंच आणि सामनाधिकारी यांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये कुमार धर्मसेना आणि पॉल रायफल हे ऍडिलेड येथे खेळल्या जाणाऱ्या भारत-इंग्लंड सेमीफायनलच्या सामन्याचे पंच म्हणून काम पाहणार आहेत. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी १.३० वाजता सुरू होईल. या सामन्यात ख्रिस गॅफनी हे तिसरे पंचकाम पाहतील, तर रॉड टकर हे चौथ्या पंचांच्या भूमिकेत असणार आहेत. तसेच डेव्हिड बून हे सामनाधिकारी म्हणून काम पाहतील.
त्याचबरोबर न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सेमीफायनल सामना बुधवारी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी मॅरेस इरास्मस आणि रिचर्ड इलिंगवर्थ हे मैदानी पंच असतील. तर तिसरे पंच म्हणून रिचर्ड केटलबरो आणि चौथे पंच म्हणून मायकेल गॉफ काम पाहतील. तसेच सामनाधिकारी म्हणून ख्रिस ब्रॉड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर १३ नोव्हेंबरला होणाऱ्या फायनल सामान्यबाबत पंचांच्या नावांची घोषणा ही सेमीफायनलनंतर केली जाईल, असे आयसीसीने ( ICC ) म्हटले आहे.