करोनाला आळा घालण्यासाठी 25 मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झाले. या साथीचा वेळीच प्रसार रोखणे आणि साथ थोपविणे हा त्यामागील उद्देश होता, या काळात अडचणीत असलेल्या प्रभागातील तसेच प्रभागा बाहेरील नागरिकांना लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून मदतीसाठी पुढे आलेले नाव म्हणजे प्रभाग क्रमांक 3 विमान नगर-सोमनाथ नगरचे भारतीज जनता पक्षाचे कार्यक्षम नगरसेवक राहुल भंडारे, करोनाच्या विळख्यात अडचणीत आलेल्या समाजातील प्रत्येकासाठी वेगवेगळया उपक्रमांच्या माध्यमातून केलेले काम अमीट आहे.
अन्नधान्य कीटचे वाटप, सोसायटी परिसराचे निर्जंतूकीकरण, सोसायटीमधील नागरिकांसाठी घरपोच अत्यावश्यक सेवा, रोगप्रतीकार शक्ती वाढविण्यासाठी मोफत औषधे असे उपक्रम त्यांनी राबविले. या सर्व कामात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, खासदार संजय नाना काकडे, गिरीश बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सोसायट्यातही अत्यावश्यक सेवा
लॉकडाऊनच्या काळात प्रभागात रूग्ण सापडण्यास सुरूवात झाल्याने कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे प्रभागात सोसायटयांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना भाजीपाला व अन्य धान्य खरेदी करण्यासाठी टंचाई भासू लागली होती.त्यांनी माझ्याशी फोनवर संपर्क केला व मदत करण्याची विनंती केली. त्यानंतर नागरिकांची अडचण लक्षात घेऊन भंडारे यांनी शेतकरी ते ग्राहक भाजीपाला विक्री हा उपक्रम प्रत्येक सोसायटी आवारात राबविला. या शिवाय, ऑनलाईन यंत्रणेद्वारे सोसायटीतच घरपोच किराणा पोहोचविण्यात आला.
प्रभागासाठी स्वतंत्र कोविड सेंटर
प्रभागातील नागरिकांना चाचणीसाठी तसेच विलगीकरणासाठी खराडी येथे जावे लागत होते. प्रभागातील रूग्णांसाठी विमान नगर मधील राजीव नगर येथील एस आर ऐ बिल्डिंग येथे कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी भंडारे यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यानंतर तत्काळ कोविड सेंटर सुरू करण्याचे आदेश आले, तसेच क्षेत्रीय कार्यालय निहाय चाचणी केंद्रही सुरू करण्याची मागणी भंडारे यांनी केली होती. त्यासही महापालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत हे केंद्र सुरू केले.
प्रभागात औषध फवारणी
करोनाच्या कालावधीत भंडारे यांनी पूर्ण प्रभागात औषध फवारणी मोहीम राबविली. प्रभागात रूग्ण आढळून येताच, स्वत: त्या परिसरात जाऊन प्रत्येक सोसायटीमध्येही फवारणी करण्यात आली. पूर्ण प्रभागात रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी गोळ्या. मास्क वाटप केले. प्रत्येक सोसायटीमध्ये स्वखर्चाने हॅन्ड फ्री सॅनेटायझर मशीनचे वाटप केले. तर बीजेएस संघटनेच्या माध्यमातून डॉक्टर आपल्या दारी उपक्रमातून साडेतीन ते चार हजार नागरिकांची तपासणी झाली.
12 हजार अन्नधान्य किट वितरण
करोनाच्या लॉकडाऊनमध्ये नगरसेवक भंडारे यांना प्रभागातील वस्त्यांसह, प्रभागालगतच्या वस्त्यांमधून त्यांना मदतीसाठी फोन आले. सर माझ्या घरात खायला काहिच नाही.दोन दिवसांपासून मुलं उपाशी आहे. सर मैं युपी का रहने वाला हु, सर मैं बिहार, सर मैं पंजाब, सर मैं झारखंड, सर मैं उत्तराखंड , तर साहेब मी बर्मीसेल झोपडपट्टीतून बोलतो…सगळ्यांचं म्हणणं एकच घरात खायला नाही मदत करा, त्यानंतर लोकांची ही अवस्था पाहून व्यथीत झालेल्या नगरसेवक भंडारे यांनी मदतीचे शिवधनुष्य उचलले. या लॉकडाऊनच्या कालावधीत तब्बल 12 हजार कुटुंबांना भंडारे यांनी अन्नधान्य कीट पुरविले, त्यात साखर,तेल, डाळ, पीठ, तांदूळ व मसाले, मीठ व बिस्किटे होती.
‘करोना’तील उल्लेखनीय काम
– 12 हजार जणांना धान्याचे कीट वाटप
– प्रभागात प्रतिकार शक्तींच्या औषधांचे वाटप
– परप्रांतीय मजूरांना घरी जाण्यासाठी बसची सोय
– बांधकाम मजूरांना राहणे तसेच जेवणाची सोय
– प्रभागासाठी स्वतंत्र कोविड सेंटर
– प्रभागात सॅनिटाझरचे वाटप
– प्रभागासाठी डॉक्टर आपल्यादारी उपक्रम