24 तासांत 332 रुग्ण, करोनाचे एकूण बळी 214; एकूण रुग्णसंख्या 6836
सातारा (प्रतिनिधी)- जिल्ह्यात करोनाचा कहर कायम असून आणखी 332 जणांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी 85 जणांचा रिपोर्ट शुक्रवारी सायंकाळी आला. तर गुरूवारी रात्री 247 जण करोनाबाधित निष्पन्न झाले होते. शुक्रवारी आठ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 6836 झाली आहे. तर करोनामुळे बळी पडलेल्या रुग्णांची संख्या 214 वर पोहचली आहे.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील प्रयोगशाळेतील अहवालानुसार जिल्ह्यातील 85 संशयितांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी आज सायंकाळी दिली. या करोनाबाधित अहवालामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 10, महाबळेश्वर 37, गोगवे 10., कराड तालुक्यातील कराड 1., सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहुली 1, सातारा 3, करंजे 1., कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, कुमठे 1, रहिमतपूर 1, मांडवे 3., खटाव तालुक्यातील मायणी 1, खटाव 3, वडूज 1., पाटण तालुक्यातील ढेबेवाडी 1., खंडाळा तालुक्यातील खंडाळा 2., जावळी तालुक्यातील सरताळे 5 व इतर तीन जणांचा समावेश आहे. त्यापूर्वी जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 247 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तसेच आठ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील सोनवणे यांनी दिली. या करोनाबाधित रुग्णांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.
कराड तालुका ः डावरवाडी एक पुरुष, चोरे एक पुरुष, एक महिला केसे एक पुरुष, मसूर दोन पुरुष, दोन महिला, शिवडी एक महिला, वाडवडी एक पुरुष, कोळे पाच पुरुष, एक महिला, वाघेरी एक पुरुष, कार्वे दोन पुरुष, साळशिरंबे दोन पुरुष, एक महिला, आगाशिवनगर एक महिला, मलकापूर येथील तीन पुरुष, कासेगाव दोन पुरुष, एक महिला, उंडाळे एक पुरुष, दौलत कॉलनी एक पुरुष, कापील एक पुरुष, गोटे एक पुरुष, ओंड एक पुरुष, विद्यानगर एक पुरुष, विंग गुथाळे एक पुरुष. कराड 15 पुरुष, 9 महिला, 6 व 14 वर्षाचा मुलगा, सुलतानवाडी रोड एक महिला, बुधवार पेठ चार पुरुष, तीन महिला, शनिवार पेठ दोन पुरुष, तीन महिला, रविवार पेठ दोन पुरुष, एक महिला, मंगळवार पेठ तीन पुरुष, एक महिला, 7 वर्षाची मुलगी, गुरुवार पेठ तीन महिला, एक पुरुष, शुक्रवार पेठ दोन पुरुष, दोन महिला, मुजावर कॉलनी एक पुरुष, एक महिला, रेव्ह्यून्यू कॉलनी एक महिला, शिवाजी हौसिंग सोसायटी एक युवती, एक महिला, 10 वर्षाचा बालक. वाई तालुका ः सह्याद्रीनगर एक पुरुष, रविवार पेठ दोन पुरुष, 9 वर्षाचा मुलगा, फुलेनगर तीन पुरुष, एक महिला, गणपती आळी एक पुरुष, गंगापुरी एक पुरुष, नावेचीवाडी एक पुरुष, ब्राम्हणशाही एक पुरुष, बावधन एक महिला, धोम कॉलनी एक महिला, धोम एक पुरुष, एक महिला, उडतारे एक पुरुष.
सातारा तालुका ः सातारा चार पुरुष, दोन महिला, अंबेदरे एक महिला, कोडोली चार पुरुष, एक महिला, कोडोली एमआयडीसी एक पुरुष, पुसेसावळी एक पुरुष, अंतावाडी एक पुरुष, गुरुवार पेठ एक महिला, शाहूपुरी एक पुरुष, एक महिला, पीरवाडी एक महिला, खिंडवाडी एक महिला, जांब एक 70 वर्षीय महिला, सदरबझार एक पुरुष, करंजे पेठ एक पुुरुष, अतीत एक महिला, कोंडवे एक महिला, गोडोली दोन पुरुष, दोन महिला, मोरघर एक पुरुष, रामाचा गोट एक पुरुष, शनिवार पेठ सात पुरुष, 11 महिला, 7, 10, 11 वर्षाचा मुलगा, 2 वर्षाची मुलगी. कोरेगाव तालुका ः देऊर तीन पुरुष, एक महिला, कोरेगाव दोन पुरुष, संभाजीनगर कोरेगाव एक पुरुष, लक्ष्मीनगर कोरेगाव एक पुरुष, करंजखोप दोन पुरुष, पळशी तीन पुरुष, चार महिला, 6 वर्षाचा मुलगा, 6 वर्षाची मुलगी.पाटण तालुका – पाटण 10 पुरुष, सात महिला, कोयनानगर एक महिला, मिरगाव एक पुरुष, कावडेवाडी एक पुरुष, जावळी तालुका – नेवेकरवाडी एक महिला, मेढा चार पुरुष, चार महिला, 10, 12 वर्षाची मुलगी.खंडाळा तालुका ः शिरवळ एक पुरुष, कुडाळ एक पुरुष, लोणंद एक पुरुष, पारगाव एक पुरुष, खंडाळा एक पुरुष,फलटण तालुका ः मलटण एक पुरुष, धनगरवाडा तीन पुरुष, चार महिला, 3 वर्षाची बालिका, मंगळवार पेठ एक पुरुष, कोळकी एक पुरुष, पाडेगाव एक महिला, सोमवार पेठ एक पुरुष.खटाव तालुका ः वडूज तीन पुरुष, दोन महिला, औंध एक पुरुष, पळसगाव एक पुरुष, 11 वर्षाचा मुलगा, मायणी एक पुरुष.
आठ बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात कुमठे ता. कोरेगाव येथील 81 वर्षीय पुरुष, करंजे ता. सातारा येथील 42 वर्षीय पुरुष, वाई येथील खासगी हॉस्पिटलमध्ये शिरवळ ता. खंडाळा येथील 75 वर्षीय पुरुष, कराड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये बनवडी ता. कराड येथील 63 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील खासगी हॉस्पीटमध्ये कोरेगाव येथील 78 वर्षीय पुरुष. तसेच सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये विखळे ता. कोरेगाव येथील 64 वर्षीय पुरुष, मोरघर ता. जावली येथील 70 वर्षीय पुरुष, पिरवाडी ता. सातारा येथील 63 वर्षीय पुरुष अशा एकूण आठ करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला
आहे.