मुंबई – चीनसह जगभरात हैदोस घालणाऱ्या करोना विषाणूने आता भारतात आपले पाय रोवले आहे. कोरोनाचा भारतात पहिला बळी गुरुवारी (दि. 12) गेला आहे. त्यामुळे संपूर्ण देशाला करोनाची धडकी भरली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाला खबरदारी पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
गर्दीच्या ठिकाणी न जाणे, तोंडाला मास्क लावणे यांसारख्या अनेक गोष्टी लोक करताना दिसत आहे. तसेच गर्दी होतील असे कार्यक्रम, क्रिकेट सामने देखील रद्द करण्यात आले आहेत.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषेदेचे 100वे महाराष्ट्रव्यापी नाट्यसंमेलन पुढे ढकलण्यात आले आहे. याची माहिती संमेलनाचे अध्यक्ष नवनाथ कांबळीने यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.
करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे १०० वे महाराष्ट्रव्यापी नाट्यसंमेलन पुढे ढकलण्यात आले आहे….#नाट्यसंमेलन१०० #natyasammelan100 @ashoknarkar4 @ratnakantjagtap @soumitrapote @KalpeshrajMT pic.twitter.com/12uirjDY5r
— अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (@NatyaParishad) March 13, 2020
“कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे 25 मार्च रोजी होणारे 100वे महाराष्ट्रव्यापी नाट्यसंमेलन आता पुढे ढकलण्यात आले आहे…”. अशी माहिती देण्यात आली आहे.
१०० व्या नाट्यसंमेलनाचे सन्माननीय स्वागताध्यक्ष आणि नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त मा. खा. श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते ‘बोधचिन्ह अनावरण’ सोहळा..#नाट्यसंमेलन१०० #natyasammelan100 pic.twitter.com/DRxxyWvCKF
— अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (@NatyaParishad) February 27, 2020