‘भाजपच्या कैदेतून आमचे आमदार सोडवा’

नवी दिल्ली : देशातील मध्यप्रदेशात एकच वादळ उठले आहे. त्यातून ज्योतिरादित्य सिंधीया यांनी कॉंग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच १९ आमदारांनीही राजीनामा दिला आहे. अशातच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेत तीन पानी पत्र दिले आहे.

कमलनाथ यांनी म्हंटले कि, राज्यपालांच्या अभिभाषण आणि अर्थसंकल्पादरम्यान विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येईल. मात्र, २२ आमदारांना कैदेतून मुक्त केल्यास हे शक्य आहे.

ते म्हणाले, मध्यप्रदेशमध्ये भाजप अनैतिक काम करत आहे. भाजपने घोडेबाजारी करत आहे. होळीच्या दिवशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यपालांची भेट घेत १९ काँग्रेस आमदारांचा राजीनामा सोपविला. विशेष म्हणजे यावेळी एकही आमदार प्रत्यक्ष उपस्थित नव्हता, असे आवाहनही राज्यपालांना केले आहे. 

दरम्यान, कॉंग्रेसमधील बंडामुळे मध्यप्रदेशची सत्ता पुन्हा काबीज करण्याबाबत भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कॉंग्रेस सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे विधानसभेत 16 मार्चला शक्तिपरीक्षा घेतली जावी यासाठी भाजपकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच विधानसभेचे सभापतींनी बंडखोर आमदारांना हजर राहण्याचा आदेश देऊन भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. आमदारांनी स्वेच्छेने राजीनामा दिला की दबावाखाली, अशी विचारणा सभापतींनी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.