पुणे – पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात कहर माजवणाऱ्या करोनाने ग्रामीण भागातही मध्यतरी पाळेमुळे रोवले होते. नंतर ग्रामीण भागातील रुग्णसंख्या अटोक्यात आली होती.
मात्र, मंगळवारी (दि. 16) अचानक रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा करोनाचा कहर सुरू झाला आहे की काय? अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
दिवसभरात वेगवेगळ्या तालुक्यांत 24 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे काळजी घ्या, शासनाच्या नियमांचे पालन केल्यास करोनाला आपण रोखू शकतो, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.