मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री लारा दत्ताला करोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने तिचे वांद्रा येथील घर सील केले आहे. तसेच लाराच्या घराबाहेर मुंबई महापालिकेकडून मायक्रो कन्टेन्मेंट झोनचा फलक लावण्यात आला आहे.
दरम्यान, लारा दत्ताचे घर सील करण्यात आले. रिपोर्टनुसार, लाराच्या कुटुंबात केवळ लारालाच कोरोनाचा लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी हिककप्स आणि हुकअप्स या वेब सीरिजमधून लारा प्रेक्षकांच्या भेटीस आली. तसेच हंड्रेड आणि कौन बनेगी शिखरवती या सीरिजमध्ये लाराच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूर, रिया कपूर, नोरा फतेही, मृणाल ठाकुर या कलाकारांना देखील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.