‘तू मंदिर, तू शिवाला’ गाण्याच्या माध्यमातून कोरोना योद्धांचे आभार मानले

मुंबई – जगात कोरोनाने चांगलाच थैमान घातला आहे. देशांमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 2 लाख 39 हजार पार पोहोचली आहे.यातच  करोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी पोलीस, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी दिवसरात्र मेहनत करत आहेत. या योद्धांचे सर्व नागरिकांनी तसेच राजकीय नेते, बॉलीवूड सेलेब्स यांनी टाळ्या वाजवत तर कधी फुलांचा वर्षाव करीत आभार मानले आहेत. यातच आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गाण्याच्या माध्यमातून या योद्धांचे आभार मानले आहेत.

दरम्यान,‘तू मंदिर, तू शिवाला’ असं या गाण्याचं शीर्षक आहे. सध्या सोशल मीडियावर या गाण्याने रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.लॉन्च झाल्यानंतर काही तासांतच या गाण्याला चार लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याला आशिष मोरे यांनी संगीतबद्ध केले आहे. तर राजू सपकाळ यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र काम करणाऱ्या योद्धांसाठी हे गाणं समर्पित केलं आहे. तत्पूर्वी, जागतिक महिला दिनानिमित्त अमृता यांचे नवे गाणे लॉंच केले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.