Hari Hara Veera Mall| साऊथचा सुपरस्टार पवन कल्याणचा आगामी चित्रपट ‘हरी हर वीरा मल्लू’चा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण मोठ्या बजेटमध्ये करण्यात आले आहे. या चित्रपटात बॉबी देओल खास भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटाच्या टीझरमध्ये पवन कल्याणची व्यक्तिरेखा योद्धा म्हणून दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात तो गरीब शोषितांच्या न्यायासाठी मुघलांशी लढताना दिसणार आहे. यासोबतच टीजरमध्ये सर्वात खास झलक बॉबी देओलच्या व्यक्तिरेखेची दिसते. तो क्रूर मुघल शासक औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे. पवन कल्याण आणि बॉबी देओल या दोन्ही स्टार्सचा अभिनय दमदार दिसत आहे. त्याच्या या लुकने सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.
‘हरि हर वीर मल्लू’ या चित्रपटाचं दिग्दर्शन क्रिश जगरलामुडी यांनी केले आहे. सुमारे 200 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहे. पवन आणि बॉबी व्यतिरिक्त निधी अग्रवाल, नोरा फतेही, विक्रमजीत विर्क आणि नर्गिस फाखरी हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटाचे संगीत ‘आरआरआर’ फेम एमएम किरवाणी यांनी दिले आहे. Hari Hara Veera Mall|
दरम्यान, गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘ॲनिमल’च्या यशानंतर बॉबी देओल पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘हरी हर वीर मल्लू’ व्यतिरिक्त तो ‘कांगुवा’ चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार सूर्या मुख्य भूमिकेत असणार आहे.
हेही वाचा:
Weather Update| कोकणासह ‘या’ भागात उष्णतेची लाट राहणार कायम; तर काही ठिकाणी पावसाची शक्यता