पुणे – पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये करोना बाधित रुग्ण आढळल्याने येथिल सर्व कर्मचाऱ्यांची रॅपिड अॅटिजेन चाचणी करण्यात येत आहे.
दरम्यान, शहरात सोमवारी नव्याने 1,160 बाधित सापडले असून, बाधितांची एकूण संख्या 49 हजार 217 वर पोहचली आहे. त्यामुळे सध्याचा बाधित सापडण्याचा वेग लक्षात घेता, पुढील 24 तासांत शहरातील बाधितांची एकूण संख्या 50 हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.