राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 70. 71 टक्क्यांवर

मुंबई- राज्याचा रिकव्हरी रेट 70. 71 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मृत्यूदर 2.75 टक्के इतका आहे. आतापर्यंत 55 लाख 6 हजार 276 चाचण्या करण्यात आल्या असून यामधील 11 लाख 21 हजार 221 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात आज दिवसभरात 23 हजार 365नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यासोबत राज्यातील करोनाबाधित रुग्णसंख्या11 लाख 21 हजार 221 इतकी झाली आहे. दुसरीकडे 474 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांची संख्या 30 हजार 883 इतकी झाली आहे.

दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा रोज नवा उच्चांक गाठत आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर झाल्याची लक्षणं आहे. देशात सगळ्यात जास्त कोरोना बाधित हे महाराष्ट्रात आहे.

महत्वाची बाब म्हणजे कोरोनाबाधितांचे आकडे जरी वाढत असले तरी राज्याचा रिकव्हरी रेट 70. 71 टक्क्यांवर आहे. म्हणजेत रिकवर होण्याचं प्रमाण जास्त आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.